5 कारणांमुळे गौतम गंभीर होऊ शकतो टीम इंडियाचा कोच

Gautam Gambhir टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्याच्या शर्यतीमध्ये गौतम गंभीरचं नाव सर्वात आघाडीवर आहे.

Advertisement
Read Time: 2 mins
मुंबई:

टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्याच्या शर्यतीमध्ये गौतम गंभीरचं (Gautam Gambhir) नाव सर्वात आघाडीवर आहे. गंभीर सध्या कोलकाता नाईट रायडर्सचा (KKR) मेंटॉर आहे. गंभीरच्या मार्गदर्शनाखाली केकेआरनं आयपीएल 2024 फायनलमध्ये धडक मारलीय. केकेआरचा खेळ गंभीरनं बदललाय. केकेआरला या सिझनमध्ये मिळालेल्या यशानंतर भारतीय टीमचा हेड कोच होण्यासाठी गंभीर सर्वात योग्य उमेदवार मानला जातोय. टीम इंडियाचा हेड कोच होण्यासाठी गंभीरचं नाव सर्वात आघाडीवर का आहे? याची 5 कारणं पाहूया...  

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

नेतृत्त्वक्षमता

गौतम गंभीरच्या नेतृत्त्वाखाली केकेआरनं दोन वेळा आयपीएल विजेतेपद पटकावलं होतं.  तो मागील दोन आयपीएल सिझन लखनौ सुपरजायंट्सचा मेंटॉर होता. गंङीरच्या मेंटॉरशिपमध्ये लखनौनं मागील दोन्ही सिझनमधील 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश केला होता. सध्या तो केकेआरचा मेंटॉर आहे. गंभीरच्या आगमनानंतर केकेआरचा पूर्ण कायापालट झालाय. केकेआर तिसऱ्या आयपीएल विजेतेपदापासून एक विजय दूर आहे.   

गौतम गंभीर 2.0

गौतम गंभीरनं त्याच्या आक्रमक स्वभावाला मुरड घातलीय. तो या सिझनमध्ये पूर्वीसारखा आक्रमक दिसत नाहीय. एक नवा गंभीर या सिझनमध्ये सर्वांना दिसतोय. टीमच्या जय-पराजयातही त्याचा मूड समान दिसतोय. या बदलामुळेच (गौतम गंभीर 2.0) तो टीम इंडियाचा मुख्य प्रशिक्षक होण्याच्या शर्यतीमध्ये आघाडीवर आहे. 

( नक्की वाचा : रिकी पॉन्टिंग खोटं बोलला! जय शहांनी सांगितलं 'त्या' दाव्याचं सत्य )
 

'विराट' मैत्रीची नवी सुरुवात

गेल्या आयपीएल सिझनमध्ये गंभीरचा विराट कोहलीशी मोठा वाद झाला होता. या सिझनमध्ये गंभीर स्वत:हून विराटला भेटला. त्यानं त्याच्याशी हस्तांदोलन केलं आणि जुन्या गोष्टी संपल्याचं जाहीर केलं. सोशल मीडियावर गौतम गंभीर आणि विराट कोहलीचा फोटो व्हायरल झाला होता. त्यामध्ये ते दोघंही चांगले मित्र दिसतायत. 

Advertisement

Gautam Gambhir BCCI
Photo Credit: BCCI

खेळाडूंना प्रेरणा

केकेआरच्या मागील आणि या सिझनमधील टीममध्ये फार बदल नाही. गंभीरनं यंदा फक्त मिचेल स्टार्कला विक्रमी किंमत मोजून करारबद्ध केलंय. स्टार्कचा अपवाद वगळता केकेआरची टीम समान आहे. गंभीरनं या टीमला फायनलपर्यंत नेलंय. नरेला ओपनिंगला पाठवणं, रसेलला जास्त बॉलिंग देणं हे गंभीरचे डावपेच यशस्वी ठरलेत. त्याच्या मेंटॉरशिपमध्ये वरुण चक्रवर्तीच्या खेळातही मोठी सुधारणा झालीय. खेळाडूंमध्ये जिंकण्याची जिद्द निर्माण करणे हे गंभीरचं मोठं यश आहे.

नक्की वाचा : RCB सोडून दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार विराट कोहली? IPL ट्रॉफी जिंकण्यासाठी मिळाला सल्ला 
 

मोठा अनुभव

गौतम गंभीर सर्वात मोठ्या सामन्यात मॅच विनिंग खेळी करणारा खेळाडू म्हणून प्रसिद्ध होता. भारतानं पहिल्यांदा टी20 वर्ल्ड कप जिंकला त्या फायनलमध्ये गंभीरनं 75 रन्सची महत्त्वाची खेळी केली होती. 2011 साली झालेल्या वन-डे वर्ल्ड कप फायनलमध्येही त्यानं सर्वाधिक 97 रन्स करत विजयाचा पाया रचला. गंभीरला आंतरराष्ट्रीय क्रिकेटचा मोठा अनुभव आहे. या अनुभवाचा फायदा भारतीय क्रिकेटला मिळू शकतो. 

Advertisement

Topics mentioned in this article