जाहिरात
This Article is From May 24, 2024

RCB सोडून दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार विराट कोहली? IPL ट्रॉफी जिंकण्यासाठी मिळाला सल्ला

Virat Kohli RCB : विराट कोहली पहिल्या सिझनपासून आरसीबीकडून खेळतोय. त्याला अद्याप पहिल्या आयपीएल विजेतेपदाची प्रतीक्षा आहे.

RCB सोडून दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार विराट कोहली? IPL ट्रॉफी जिंकण्यासाठी मिळाला सल्ला
Virat Kohli : आयपीएल जिंकण्यासाठी विराटला आरसीबी सोडण्याचा सल्ला मिळाला आहे. (फोटो AFP)
मुंबई:

जगातील सर्वात श्रीमंत T20 लीग असलेल्या आयपीएलला 2008 साली सुरुवात झाली. तेव्हांपासून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुला (RCB) पहिल्या विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. या आयपीएल सिझनमध्ये (IPL 2024) आरसीबीची सुरुवात खराब झाली. त्यानंतर सलग 6 सामने जिंकून त्यांनी 'प्ले ऑफ' मध्ये प्रवेश केला. एलिमेनेटरमध्ये राजस्थान रॉयल्सनं त्यांचा 4 विकेट्सनं पराभव केला. या पराभवासह आरसीबीचं स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आलंय. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

विराट कोहली पहिल्या सिझनपासून आरसीबीकडून खेळतोय. त्यालाही अद्याप पहिल्या आयपीएल विजेतेपदाची प्रतीक्षा आहे. विराटला आणखी एक सिझन विजेतेपदापासून वंचित राहावं लागलं आहे. त्यानंतर इंग्लंडचा माजी कॅप्टन केव्हिन पीटरसननं त्याला आरसीबीसोडून दिल्ली कॅपिटल्सकडून खेळण्याचा सल्ला दिलाय. विराटला आयपीएल विजेतेपद मिळावं म्हणून त्यानं ही सूचना केलीय. 

विराट आयपीएल 2024 मधील 15 मॅचमध्ये 471 रन केले. विराटनं सातत्यानं रन्स केले पण, त्याला अन्य बॅटर्सची भक्कम साथ मिळाली नाही. आरसीबीच्या बॉलर्सची कामगिरी साधारण होती. या विषयावर स्टार स्पोर्ट्सशी बोलताना पीटरसन म्हणाला की, 'मी यापूर्वी देखील सांगितलंय आज पुन्हा सांगेल अन्य खेळात महान खेळाडूंनी नवं शिखर सोडण्यासाठी आपली टीम सोडली आहे. विराटनं बराच प्रयत्न केला. त्यानं ऑरेंज कॅप मिळवली. इतकं सारं करुनही त्याची फ्रँचायझी पुन्हा एकदा अयशस्वी ठरली. मी टीमचा ब्रँड समजतो. पण, विराट कोहली आयपीएल ट्रॉफीसाठी पात्र आहे. त्यासाठी त्याला ही ट्रॉफी मिळवून देईल अशा टीमकडून खेळलं पाहिजे.'

( नक्की वाचा : विराट कोहलीच्या RCB ला अद्याप एकदाही आयपीएल चॅम्पियन का होता आले नाही? )

विराटनं कोणत्या टीमकडून खेळलं पाहिजे असा प्रश्न पीटरसनला विचारण्यात आला. त्यावर त्यानं दिल्ली कॅपिटल्सचं नाव घेतलं. 'माझ्या मते ती टीम दिल्ली हवी. त्याचं दिल्लीत घर आहे हे मला माहिती. त्यानं तिथं जास्त वेळ घालवला पाहिजे. विराटनं आता लांबचा विचार करण्याची वेळ आली आहे. रोनाल्डो दुसरीकडं गेला. मेस्सीनं गेला. हॅरी केन त्याची जुनी टीम सोडून बायर्न म्युनिचला गेला.' असं पीटरसननं यावेळी स्पष्ट केलं.  

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com