Smriti Mandhana: भारतीय महिला क्रिकेट टीमची स्टार खेळाडू स्मृती मानधना 12 वर्षांपासून देशासाठी खेळत आहे आणि यादरम्यान या जगात क्रिकेटपेक्षा अन्य कोणतीही गोष्ट प्रिय नाही, असे स्मृती मानधनाने सांगितलंय. भारताची डावखुरी बॅटर स्मृती मानधनाने वर्ष 2013 क्रिकेट क्षेत्रात पदार्पण केले. पदार्पणापासून ते मागील महिन्यात वर्ल्ड कप ट्रॉफी जिंकण्यापर्यंतच्या प्रवासात निभावलेल्या महत्त्वाच्या भूमिकांबाबत तिने आपल्या भावना व्यक्त केल्या.
क्रिकेटपेक्षा मला दुसरी कोणतीही गोष्ट आवडत नाही - स्मृती मानधना
बुधवार (10 डिसेंबर 2025) पार पडलेल्या अमेझॉन संभव समिटमध्ये (Amazon Smbhav Summit) स्मृती मानधनाने उपस्थिती दर्शवली होती. यावेळेस तिने म्हटलं की, "क्रिकेटव्यतिरिक्त माझं अन्य कोणत्याच गोष्टीवर प्रेम नाही. भारतीय जर्सी परिधान करणं हीच आमची सर्वात मोठी प्रेरणा आहे. आपण आपल्या सर्व अडचणी बाजूला ठेवतो आणि हेच तुम्हाला जीवनात लक्ष केंद्रित करण्यास मदत करते."

Photo Credit: PTI
लहानपणापासूनच स्पष्ट ध्येय : स्मृती मानधना
स्मृतीने पुढे असंही म्हटलं की, "लहानपणापासूनच बॅटिंग करण्याचे वेड होतं. कोणीही समजू शकत नव्हते, पण माझ्या डोक्यात कायम हेच होतं की मला विश्वविजेती म्हणून ओळखलं जावे".
वर्ल्ड कप ट्रॉफी आमच्या वर्षानुवर्षांच्या संघर्षाचे फळ : स्मृती मानधना
वर्ल्ड कप ट्रॉफीबाबत स्मृती म्हणाली की, "ही ट्रॉफी आमच्या टीमच्या दीर्घकाळ सुरू असलेल्या संघर्षाचे फळ आहे. या क्षणाची आम्ही आतुरतेने वाट पाहिलीय. मी 12 वर्षांपेक्षा अधिक काळ खेळतेय. कित्येकदा गोष्टी आपल्यानुसार घडत नाहीत. आम्ही फायनल मॅचपूर्वीच हा क्षण मनात अनुभवला होता आणि जेव्हा स्क्रीन तो क्षण प्रत्यक्षात उतरताना पाहिला तेव्हा अंगावर काटा आला. हा क्षण अतिशय अविश्वसनीय आणि खूपच खास होता".
मानधनाने सांगितलं की, फायनल मॅचमध्ये मिताली राज आणि झुलन गोस्मावी यांच्या उपस्थितीमुळे भावना अधिक तीव्र झाल्या होत्या. आम्हाला खरंच त्यांच्यासाठी जिंकायचं होतं. त्यांच्या डोळ्यात अश्रू पाहून वाटलं की, संपूर्ण महिला क्रिकेट जिंकत आहेत. ही लढाई म्हणजे त्यांचाही विजय होता."
स्मृती मानधना काय म्हणाली ऐका VIDEO
VIDEO | Indian cricketer Smriti Mandhana says, "I don't love anything more than cricket, wearing Indian jersey gives the motivation and keeps all problems aside."
— Press Trust of India (@PTI_News) December 10, 2025
(Full video available on PTI Videos - https://t.co/n147TvrpG7) pic.twitter.com/CMFFA3A1Nv
(नक्की वाचा: Smriti Mandhana: लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधनाच्या लेटेस्ट पोस्टचा धुमाकूळ; शांत, मौन आणि कंट्रोलबाबत म्हणाली...)
वर्ल्ड कप मॅचमधून शिकलो दोन मोठे धडे
"या वर्ल्ड कप मॅचद्वारे आम्ही दोन महत्त्वाचे धडे शिकलो. मागील डावात तुम्ही सेंच्युरी केली असली तरीही प्रत्येक डाव हा शून्यातून सुरू होतो आणि कधीही स्वतःसाठी खेळू नका, हे आम्ही सतत एकमेकांना सांगत होतो."
दरम्यान बॉलिवूड संगीतकार पलाश मुच्छलसोबत लग्न मोडल्यानंतर स्मृती मानधना एखाद्या कार्यक्रमात सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
