Virat Kohli Retirement: विराट कोहलीच्या कसोटी निवृत्तीच्या घोषणेनंतर आता संघात त्याची जागा कोण घेणार याची चर्चा सुरू झाली आहे. इंग्लंड दौऱ्याआधीच रोहित शर्मा आणि विरोट कोहली यांच्या दिग्गजांनी निवृत्तीची घोषणा केल्यानंतर संघ निवडीचं मोठं आव्हान बीसीसीआयी निवड समितीकडे असणार आहे. मात्र आधीपासून तयारीत असलेल्या निवड समितीनेही काही नावांचा आधीची विचार केलेला असावा.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
श्रेयसचा संघातील मार्ग मोकळा
विराट कोहलीच्या निवृतीनंतर दोन खेळाडू कसोटी संघात परतण्याची संधी आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, श्रेयस अय्यरला कसोटी संघात संधी मिळू शकते. कोहलीच्या जागी अय्यरला कसोटी संघात स्थान दिले जाऊ शकते. विराटच्या संघात असेपर्यंत श्रेयसला संधी मिळणे कठीण होते. मात्र विराटच्या निवृत्तीमुळे श्रेयस अय्यरचा कसोटी संघातील मार्ग मोकळा होण्याची दाट शक्यता आहे.
(नक्की वाचा- Virat Kohli Retirement: मोठी बातमी! 'किंग कोहली'चा कसोटी क्रिकेटला रामराम)
शार्दुल ठाकूरचं कमबॅक होणार
इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी शार्दुल ठाकूर देखील संघाता सामील होऊ शकतो. निवड समिती शार्दुलच्या कमबॅकचाही विचार करत आहे. क्रिकबझच्या अहवालानुसार, वेगवान गोलंदाज अष्टपैलू शार्दुल ठाकूर भारतीय संघाचा भाग बनण्यास सज्ज आहे. शार्दुल 12 ऑक्टोबर 2018 रोजी हैदराबाद येथे वेस्ट इंडिजविरुद्ध कसोटी पदार्पण केले होते. शार्दुलने आतापर्यंत भारतासाठी एकूण 11 कसोटी सामने खेळले आहेत आणि 31 विकेट्स घेण्याव्यतिरिक्त त्याने 331 धावाही केल्या आहेत. शार्दुलने डिसेंबर 2023 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतासाठी शेवटचा कसोटी सामना खेळला होता.
(नक्की वाचा- IPL 2025 पुन्हा सुरू होणार, आज वेळापत्रक येण्याची शक्यता; कोणते बदल होणार?)
विराट कोहलीची कारकीर्द
विराट कोहली कसोटी क्रिकेटमधला टीम इंडियाचा यशस्वी आणि धडाकेबाज फलंदाज होता. विराट कोहलीच्या कसोटी कारकिर्दीबद्दल बोलायचे झाले तर त्याने देशासाठी 123 कसोटी सामने खेळले आहेत. विराटने 210 डावांमध्ये 46. 85च्या सरासरीने 9230 धावा केल्या आहेत. कोहलीच्या नावावर कसोटी क्रिकेटमध्ये 7 द्विशतके, 30 शतके आणि 31 अर्धशतके आहेत.