WPL 2026 Final 2026 : स्मृती मंधाना आणि जॉर्जिया वॉल यांच्या तडाखेबंद बॅटिंगच्या जोरावर महिला प्रीमियर लीग फायलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरुनं दिल्ली कॅपिटल्सचा 6 विकेट्सनं पराभव केला. दिल्लीनं दिलेलं 204 रन्सचं खडतर आव्हान आरसीबीनं विकेट्सच्या मोबदल्यात पूर्ण केलं.
स्मृतीचा तडाखा
आरसीबीला 204 रन्सचं लक्ष्य गाठून विजेतेपद मिळवण्यासाठी कॅप्टन स्मृती मंधानावर मोठी अपेक्षा होती. स्मृतीनं ही अपेक्षा पूर्ण केली. तिने फक्त 23 बॉलमध्ये 5 फोर आणि 3 सिक्सच्या मदतीनं हाफ सेंच्युरी पूर्ण केली.
हाफ सेंच्युरीनंतरही स्मृतीचा तडाखा कायम होता. तिने जॉर्जिया वॉलसोबत कोणताही धोका न पत्कारता दिल्लीच्या बॉलर्सना वरचढ होण्याची संधी दिली नाही.
The class of Smriti Mandhana. 😍 pic.twitter.com/SM4HoCmMqe
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) February 5, 2026
जॉर्जिया वॉल 79 रन काढून आऊट झाली. जॉर्जियानं 54 बॉलमध्ये 14 फोरसह 79 रन काढले. तर स्मृती मंधनानं 87 रन काढले.
आरसीबीनं महिला प्रीमियरल लीगचं दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावले आहे.यापूर्वी आरसीबीनं 2024 साली विजेतेपद पटकावले होते.तर दिल्ली कॅपिटल्स मात्र सलग चौथ्यांदा फायनलमध्ये पोहचून दुर्दैवी ठरली आहे.
नक्की वाचा - Smriti Mandhana आणि Palash Muchhal चं लग्न का मोडलं? अभिनेत्यानं सांगितलं सांगलीमध्ये 'त्या' दिवशी काय घडलं?
कशी झाली दिल्लीची बॅटिंग?
या मॅचमध्ये पहिल्यांदा बॅटिंग करताना दिल्ली कॅपिटल्सनं निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 4 आऊट 203 रन्स केले होते. दिल्लीची कॅप्टन जेमिमा रॉड्रिग्सने जबरदस्त बॅटिंग करत टीमला 200 चा टप्पा ओलांडून दिला.
जेमिमाने फायनलच्या सामन्यात कॅप्टनला साजेशी खेळी केली आणि अवघ्या 32 बॉलमध्ये तिने हाफ सेंच्युरी ठोकली. याआधी झालेल्या एलिमिनेटर सामन्यातही जेमिमाने कमाल बॅटिंग केली होती आणि आपल्या टीमला फायनलचे पोहोचवले होते.
जेमिमा रॉड्रिग्स या सामन्यात नंबर 4 वर बॅटिंग करण्यासाठी उतरली होती. जेव्हा ती मैदानात आली, तेव्हा दिल्लीने लिजेल लीची महत्त्वाची विकेट गमावली होती. ली 30 बॉलमध्ये 37 रन करून आऊट झाली. त्यानंतर जेमिमाने धडाकेबाज बॅटिंग करत 32 बॉलमध्ये आपली हाफ सेंच्युरी पूर्ण केली. तिने या सामन्यात एकूण 37 बॉलमध्ये 57 रनची खेळी केली, ज्यामध्ये तिने 8 फोर मारले.
जेमिमा जेव्हा बॅटिंगला आली, तेव्हा तिच्या टीमला आधीच चांगली सुरुवात मिळाली होती. दिल्लीने 7.3 ओव्हरमध्ये 72 रन केले होते. तिने हीच लय पुढे नेली . दिल्लीसाठी जेमिमाशिवाय शेवटच्या ओव्हरमध्ये चिनेल हेन्रीने तुफानी बॅटिंग केली. हेन्रीने 15 बॉलमध्ये नाबाद 35 रन बनवले, ज्यामुळे दिल्लीने 200 रनचा आकडा पार केला. तिने या खेळीत 4 फोर आणि 2 सिक्स मारले.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world