
India vs England Test Series : भारत विरुद्ध इंग्लंड यांच्यातील अँडरसन-तेंडुलकर ट्रॉफीमध्ये मोहम्मद सिराजनं दमदार कामगिरी केली. या सीरिजमध्ये सिराजनं सर्वाधिक 23 विकेट्स घेतल्या. पाचव्या टेस्टच्या शेवटच्या दिवशी सिराजनं इंग्लंडच्या तळाच्या बॅटर्सना झटपट आऊट केले. भारताला 6 रन्सनं विजय मिळवून देण्यात आणि सीरिज बरोबरीत सोडवण्यात सिराजने मोलाची भूमिका बजावली. विशेष म्हणजे, शेवटच्या दिवशी इंग्लंडला विजयासाठी फक्त 35 रन्सची गरज होती, त्यामुळे सिराजचे हे यश अधिकच खास ठरले. सिराजच्या या शानदार कामगिरीनंतर, हैदराबादचे खासदार आणि एआयएमआयएम (AIMIM) प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी त्यांच्या खास हैदराबादी शैलीत प्रतिक्रिया दिली.
काय म्हणाले होते ओवैसी?
हैदराबादच्या या तरुण खेळाडूचे अभिनंदन करताना ओवैसी यांनी X वर पोस्ट केले, “नेहमीच विजेता @mdsirajofficial! आपण हैदराबादी भाषेत म्हणतो, 'पूरा खोल दिये पाशा!'" (या वाक्याचा अर्थ असा आहे की सिराजने आपल्या खेळाने कमाल केली.)
आता सिराजनेही या कौतुकाला उत्तर दिले आहे. त्याने X वर लिहिले, "खूप खूप धन्यवाद सर, तुम्ही नेहमीच मला प्रोत्साहन देता."
Thank you so much sir ❤️🙏🏽 always cheering for me. https://t.co/74iVC1hxaU
— Mohammed Siraj (@mdsirajofficial) August 6, 2025
दरम्यान, मोहम्मद सिराजची संकटासमोर हार न मानण्याची वृत्ती त्याला इतरांपेक्षा वेगळे ठरवते आणि त्यामुळे तो कोणत्याही फलंदाजासाठी आव्हान ठरतो, असं मत इंग्लंडचा माजी ऑल राऊंडर मोईन अलीनं व्यक्त केलंय.
जीएफएस डेव्हलपमेंट्सच्या एका प्रसिद्धीपत्रकात मोईन अली म्हणाला, "इंग्लंड मालिकेत सिराजची कामगिरी उत्कृष्ट होती. त्याची ऊर्जा, आक्रमकता आणि सातत्य हे जागतिक दर्जाचे आहे. तो भारतासाठी एक खरा मॅच-विनर बनला आहे आणि त्याचा सामना करणे बॅटर्ससाठी नेहमीच एक आव्हान असते."
( नक्की वाचा : Jasprit Bumrah : आशिया कपपूर्वी टीम इंडियाला धक्का! जसप्रीत बुमराह आऊट, कारण काय? )
तो पुढे म्हणाला, "त्याचे बॉलवरील नियंत्रण मला सर्वात जास्त प्रभावित करते. तो कधीही हार मानत नाही त्याने केलेल्या या कामगिरीचे श्रेय त्यालाच जाते."
विशेष म्हणजे सिराज या सीरिजमधील सर्व 5 टेस्ट मॅच खेळला आणि त्याने तब्बल 185.3 ओव्हर्स बॉलिंग केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world