जाहिरात

6,6,4,6 युवराज सिंहचं ऑस्ट्रेलियाविरुद्ध रौद्र रुप, जुन्या आठवणी झाल्या ताज्या, Video

World Championship of Legends 2024: टीम इंडियाचा दिग्गज ऑलराऊंर युवराज सिंहनं (Yuvraj Singh) जुन्या आठवणी जागवणारी खेळी केली आहे.

6,6,4,6 युवराज सिंहचं ऑस्ट्रेलियाविरुद्ध रौद्र रुप, जुन्या आठवणी झाल्या ताज्या, Video
Yuvraj Singh
मुंबई:

India Champions vs Australia Champions, World Championship of Legends 2024: टीम इंडियाचा दिग्गज ऑलराऊंर युवराज सिंहनं (Yuvraj Singh) जुन्या आठवणी जागवणारी खेळी केली आहे. इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लिजेंड्स (WCL) स्पर्धेच्या सेमी फायनलमध्ये युवराजनं ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सविरुद्ध फक्त 28 बॉलमध्ये 59 रनची खेळी केली. युवराजनं या खेळीत 4 फोर आणि 5 सिक्स लगावले. त्याच्या या आक्रमक खेळाच्या जोरावर इंडिया चॅम्पियन्सनं फायनलमध्ये प्रवेश केलाय.

या मॅचमधील 13 व्या ओव्हरमध्ये झेवियर डोहार्टीला लक्ष्य केलं. या ओव्हरच्या पहिल्या बॉलवर युवराजनं मिडविकेटच्या दिशेनं खेळत 1 रन काढला. दुसऱ्या बॉलवर युसूफ पठाणनं सिक्स लगावला. पठाणनं तिसऱ्या बॉलवर एक रन काढत युवराजला स्ट्राईक दिला. 

त्यानंतर युवराजनं गियर बदलत ऑस्ट्रेलियन बॉलरवर वर्चस्व गाजवलं. त्यानं चौथ्या बॉलवर लाँग ऑफच्या वरुन एक जोरगार सिक्स लगावला. त्यानंतर 5 व्या बॉलवर डीप मिड विकेटच्या दिशेनं चौकार लगावला. दोन मोठ्या फटक्यानंतरही युवराज शांत झाला नाही. त्यानं शेवटच्या बॉलवर लाँग ऑनवरुन एक सुंदर सिक्सर लगावला. 

युवराजच्या या खेळीनं ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मोठ्या मॅचमधील त्याच्या जुन्या इनिंगच्या आठवणी ताज्या झाल्या. फॅन्सनी त्याची यादीच देत युवराजला सलाम केला आहे.

भारताचा विजय

इंडिया चॅम्पियन्सनं या सामन्यात पहिल्यांदा बॅटिंग करताना निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 6 आऊट 254 रन केले. युवराजसह रॉबिन उथप्पा (65), युसूफ पठाण (51) आणि इरफान पठाण (50) यांनी हाफ सेंच्युरी झळकावली.  ऑस्ट्रेलिया चॅम्पियन्सला हे आव्हान पेलवलं नाही. त्यांना 7 आऊट 168 रनच करता आले. इंडिया चॅम्पियन्सनं 68 रननी मोठा विजय मिळवत फायलमध्ये प्रवेश केला. 

( नक्की वाचा : द्रविडनं विजेतेपद मिळवून दिलं, नवा हेड कोच गंभीरसमोर आहेत 5 मोठी आव्हानं )
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com