गणेशोत्सवादरम्यान मुंबईत गणेशभक्तांना जणू दोन सिद्धिविनायक मंदिरांच्या दर्शनाची अनुभूती घेता येते. एक म्हणजे प्रभादेवीतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर आणि दुसरं मस्जिद बंदर येथील मोरया गणेशोत्सव मंडळाने साकारलेली सिद्धिविनायक मंदिराची हुबेहुब प्रतिकृती.... गेल्या 13 वर्षांपासून या मंडळाकडून सिद्धिविनायक मंदिराची प्रतिकृती साकारली जाते. मंदिराच्या गाभाऱ्याबाहेरील रचना मूळ सिद्धिविनायक मंदिरासारखी साकारण्यात येत असल्याने हा देखावा गणेशभक्तांसाठी विशेष आकर्षण ठरतो. या अनोख्या सिद्धिविनायक मंदिराच्या प्रतिकृतीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी.