Nagpur news | इंदोरा चौक ते दिघोरी चौक, राज्यातील आज सर्वात लांब उड्डाणपुलाचं आज लोकार्पण । NDTV

Nagpur news | इंदोरा चौक ते दिघोरी चौक, राज्यातील आज सर्वात लांब उड्डाणपुलाचं आज लोकार्पण । NDTV Nagpur news | Inaugurating the longest flyover in the state from Indora Chowk to Dighori Chowk today. NDTV नागपूरच्या वाहतुकीला नवी दिशा देणाऱ्या आणि शहराच्या पूर्व-पश्चिम भागाला जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी उड्डाणपुलाचे आज लोकार्पण होणार आहे. इंदोरा चौक ते दिघोरी चौक असा तब्बल ९.८ किलोमीटर लांबीचा हा उड्डाणपूल असून, त्याची रुंदी १२ मीटर आहे. दाट वस्तीतून हा उड्डाणपूल उभारण्यात आल्यामुळे या ठिकाणी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या विभागाला मोठी कसरत करावी लागली. दाट वस्ती असल्याने नागरिकांना त्रास होऊ नये, यासाठी उड्डाणपुलाच्या मार्गावर साऊंड बॅरिअर्स उभारण्यात आले आहेत. त्यामुळे महामार्गावरील वाहतुकीचा आवाज रस्त्यालगतच्या घरांपर्यंत पोहोचणार नाही.

संबंधित व्हिडीओ