संतोष देशमुखांच्या हत्येला एकोणीस दिवस उलटून गेले आहेत. मात्र अजूनही प्रमुख आरोपींना गजाआड करण्यात यश आलेलं नाही. बीडमध्ये संतोष देशमुखांना न्याय देण्यासाठी हजारोंच्या संख्येनं जनसमुदाय उसळला होता. राज्यातील सर्वपक्षीय नेते देखील एकाच मंचावर उपस्थित होते आणि यावेळी मंत्री धनंजय मुंडेंविरोधात सर्व पक्षीय नेत्यांनी अगदी जोरदार टीका केली.