फाशी किंवा औषध पिण्याशिवाय पर्याय नाही, Ahilyanagar च्या शेतकऱ्यानं कृषिमंत्र्यांसमोर मांडली व्यथा

अहिल्यानगर जिल्ह्यातील अर्जुन औशीकर या शेतकऱ्यानं कृषिमंत्र्यांसमोर आपल्या व्यथा मांडल्यात.. दिनेश ईश्वरलाल संकलेचा आणि जयंत रमणलाल बलदोटा या खाजगी सावकारांकडून पाच लाख रुपयांची मागणी केली जात असल्याची तक्रार या शेतकऱ्याने केलीय. . या खाजगी सावकारांविरोधात औशीकर यांनी उपजिल्हा निबंधाकडे तक्रार दाखल केली आहे. ती मागे घेण्यासाठी औशीकर यांना धमकावलं जातंय.गेल्या चार दिवसापासून हा शेतकरी वनवन भटकत असून कर्जत पोलिसांकडून देखील न्याय मिळत नसल्याने या शेतकऱ्याने थेट राज्याच्या कृषिमंत्र्यांना गाठलं आणि त्यांच्यापुढे आपली कैफियत मांडली.यावर कृषी मंत्री भरणे यांनी थेट अहिल्यानगरच्या उपजिल्हा निबंधकांना फोन लावला आणि या शेतकऱ्याला तात्काळ मदत करा अशा सूचना केल्या. सध्या दुष्काळाची परिस्थिती आहे अजिबात शेतकऱ्यांना त्रास देऊ नका अशा सूचना खात्याअंतर्गत त्या खाजगी सावकारांना कराव्यात अशा सूचना भरणे यांनी दिल्या आहेत.

संबंधित व्हिडीओ