उपमुख्यमंत्री अजित पवारांनी शरद पवारांच्या बाजूला बसण्याचं टाळलं. आधी जी बैठक व्यवस्था करण्यात आली होती, त्या बैठक व्यवस्थेत अजित पवार हे शरद पवारांच्या शेजारी बसणार होते. मात्र त्यानंतर शरद पवार आणि अजित पवार यांनी शेजारी बसणं टाळल्याचं स्पष्ट दिसतंय. आज पुण्यात वसंतदादा शुगर इंस्टीट्यूटची 47वी वार्षिक सर्वसाधारण सभा आणि पारितोषिक समारंभ पडतंय.या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, शरद पवार, दिलीप वळसे पाटील यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित आहेत. शरद पवारांच्या उजव्या बाजुला अजित पवार तर डाव्या बाजुला दिलीप वळसे पाटील अशी बैठक व्यवस्था करण्यात आली होती, मात्र, दोघांनीही बाजूला बसण्याचं टाळलं असल्याचं दिसून येत आहे.