अकोला जिल्ह्यात यंदा अल निनोच्या प्रभावामुळे मान्सूनमध्ये पावसाने दडी मारल्याने दुष्काळाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, तब्बल २० ते २२ वर्षांपूर्वी अनुभवलेल्या भीषण परिस्थितीची आठवण करून देणाऱ्या या दुष्काळात आता काटेपूर्णा प्रकल्पातील पाणीसाठाही घटला आहे. अकोल्याच्या बार्शीटाकळी तालुक्यातील महान येथील काटेपूर्णा प्रकल्पात सध्या केवळ १७ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. या प्रकल्पातून अकोला महानगरपालिका, अकोला एमआयडीसी आणि मूर्तिजापूर तालुक्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा केला जातो.दरम्यान, संभाव्य पाणीटंचाई टाळण्यासाठी नागरिकांनी पाण्याचा अपव्यय करू नये आणि उपलब्ध पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन पाटबंधारे विभागाने केले आहे. याचा सविस्तर आढावा घेतला आमचे प्रतिनिधी योगेश शिरसाट प्रतिनिधी यांनी