Mumbai मध्ये शिंदेंच्या शिवसेनेला पदाधिकारी मिळेना, शिंदेंचं मुंबईतील पक्ष बांधणीकडे दुर्लक्ष? सूत्र

दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या मुंबईतील संघटनात्मक बांधणीचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. मुंबईतील अनेक महत्त्वाच्या विभागांमध्ये अद्याप पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या झालेल्या नसल्याची चर्चा असून त्यामुळे इच्छुक कार्यकर्त्यांमध्ये नाराजी असल्याचे बोलले जात आहे. कांदिवली आणि चारकोप परिसरात विभागप्रमुखांच्या नियुक्त्या अद्याप झालेल्या नाहीत, तर काही ठिकाणी नियुक्त्या झाल्या असल्या तरी पदाधिकाऱ्यांमध्ये अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचे सांगितले जात आहे. शिवडी, कुलाबा आणि मलबार हिलसारख्या भागांमध्ये पदाधिकाऱ्यांना बडतर्फ केल्यानंतर नव्या नियुक्त्यांबाबतही निर्णय झालेला नाही. त्यामुळे मुंबईतील पक्षबांधणी आणि संघटनात्मक नियुक्त्यांबाबत शिंदे गट नेमकी काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

संबंधित व्हिडीओ