भाषणाच्या उत्तरार्धात मनोज जरांगे यांनी थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना उद्देशून एक स्फोटक सवाल केला, "एकनाथ शिंदे साहेबांनी भाजपच्या दिल्लीतील आणि महाराष्ट्रातील नेत्यांना सांगितले आहे का, की 'मनोज जरांगेंना 500 कोटी रुपये द्यायचे आहेत' आणि भाजपकडून ते पैसे घेऊन श्रीकांत शिंदे यांच्या हस्ते ते मला दिले आहेत? भाजपच्या अंतर्गत वर्तुळात आणि नेत्यांमध्ये ही कुजबुज सुरू आहे की जरांगेंना 500 कोटी पोहोचले आहेत. शिंदे साहेब, आजच्या दसरा मेळाव्यात किंवा उद्या संध्याकाळपर्यंत या प्रश्नाचे जाहीर उत्तर द्या. जर खरोखरच दिले असतील तर 'हो' म्हणा आणि नसतील दिले तर तेही जाहीरपणे सांगा. भाजप तुम्हाला संपवत आहे की तुम्ही मला संपवत आहात, याचा छडा लागलाच पाहिजे."