आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर भाजपने मोठी राजकीय खेळी केली आहे. आमदार अमित साटम यांची मुंबई भाजपच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. मंत्री आशिष शेलार यांच्या जागी ही जबाबदारी साटम यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. ठाकरे बंधूंना रोखण्यासाठी भाजपने हा निर्णय घेतल्याची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा आहे.