मराठा आरक्षणासाठी निघालेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या मोर्चाचा मुक्काम आज जुन्नर शहरात आहे. स्थानिक कार्यकर्त्यांनी मुक्कामाची जय्यत तयारी केली आहे. उद्या सकाळी ते शिवनेरी किल्ल्याचे दर्शन घेऊन मुंबईकडे पुढील प्रवासाला सुरुवात करतील.