मनोज जरांगे पाटील यांच्या टीमने मुंबईच्या आझाद मैदानाची पाहणी केली आहे. २९ ऑगस्टच्या ऐतिहासिक आंदोलनासाठी ५,००० हून अधिक कार्यकर्त्यांसाठी व्यवस्था करण्यात येत आहे. हे आंदोलन उपोषण असल्याने जेवणाची सोय नसेल, असे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.