Amit Shah यांनी वाचला Congress च्या पराभवाचा पाढा, पाहा काय म्हणाले अमित शाह ? NDTV मराठी

गेल्या सात ते आठ दिवसांपासून राहुल गांधींच्या नेतृत्वात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनांमधून राहुल गांधींनी SIR प्रक्रियेवर संशय व्यक्त करत मोदी शाहांवर गंभीर आरोप केलेत. याच आरोपांना उत्तर देण्यासाठी आता थेट अमित शाह मैदानात उतरलेत.. अमित शाहांनी गुजरात, पश्चिम बंगाल, त्रिपुरासह इतर राज्यांमधील काँग्रेसच्या पराभवाचा पाढा वाचून दाखवलाय.. या राज्यांमध्ये गेल्या अनेक दशकांपासून काँग्रेसचा विजय झालेला नाही..मग आता सुरू झालेल्या SIR प्रक्रियेला दोष का देता ? असा सवाल अमित शाहांनी केलाय.. SIR ला विरोध करून घुसखोरांना वाचवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप अमित शाहांनी केलाय.. सोबतच 2029 च्या पराभवासाठी तयार राहण्याचं आवाहनही शाहांनी केलंय.. Amit Shah lists the reasons for Congress's defeat; see what he said. NDTV Marathi

संबंधित व्हिडीओ