मुंबई उच्च न्यायालयाचा FDA ला पुन्हा दणका! पुण्यातील गुरनानक डेअरी अँड स्वीट्सला दिलासा राज्यभरात कारवायांचे सत्र राबवणाऱ्या FDA ला मुंबई उच्च न्यायालयाने 5 लाखांचा दंड ठोठावलाय. मोहिमेचा हेतू कौतुकास्पद आहे पण सध्या प्रशासनाची ही कारवाई अतिरेकी असल्याचं कोर्टाने म्हटलंय. पुण्यातील 'गुरुनानक डेअरी अँड स्वीट्स' या दुकानातर्फे कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. 12 जून रोजी या दुकानाचा परवाना निलंबित करण्यात आला होता. त्रुटी दूर केल्यानंतर FDA अधिकाऱ्यांनी दुकानाची पाहणीही केली. 98 टक्के त्रुटी दूर केल्याचे आणि नियमांचे पालन केल्याचे FDA ने म्हटलं होतं. यानंतरही परवाना निलंबितच ठेवल्याने दुकान मालकाने हायकोर्टात धाव घेतली होती. जूनपासून दुकान बंद असल्याने आपले 8 लाखांहून अधिकचे नुकसान झाल्याचा दावा त्यांनी याचिकेत केला होता.