2-4 जणांना निवृत्त केल्यानंतरच निवृत्त व्हायचं; Pankaja Munde यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण

बीड-परळी महामार्गावरून प्रवास करताना तोच रस्ता, तीच माणसं पाहून रिटायरमेंट घ्यावीशी वाटते, असं काही दिवसांपूर्वी मंत्री पंकजा मुंडे यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानाची राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली. मात्र आता केजमधील एका कार्यक्रमात पंकजा मुंडेंनी आपल्या रिटायरमेंटच्या चर्चेवर थेट भाष्य केलंय. माध्यमांनी ‘ताई रिटायर्ड होणार’ अशा बातम्या केल्या, पण मी रिटायर्ड होणार नाही, मी चांगली खमक्या आहे, असं त्या म्हणाल्या. इतकंच नाही तर, ‘रिटायर्ड कशामुळे व्हायचं? दोन-चार लोकांना रिटायर्ड केल्यानंतर आपण रिटायर्ड व्हायचं,’ असं सूचक विधानही त्यांनी केलं. 2-4 जणांना निवृत्त केल्यानंतरच निवृत्त व्हायचं; Pankaja Munde यांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण | NDTV मराठी

संबंधित व्हिडीओ