भारती पवार यांची भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षपदी वर्णी, NDTV मराठीला दिली प्रतिक्रिया भाजपची बहुचर्चीत राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर झाली. राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यकारणी काम करणार आहे. प्रत्येकावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या देण्यात आल्या आहेत. महाराष्ट्राचा विचार करायचा झाल्यास विनोद तावडे हे राष्ट्रीय सरचिटणीसपदी कायम आहेत. पियुश गोयल राष्ट्रीय कोषाध्यक्षपदी आहे. तर माजी खासदार भारती पवार यांची राष्ट्रीय उपाध्यक्षपदी वर्णी लागली आहे.