#BachpanManao | EkStep आणि NDTV ची सामाजिक मोहीम, जिथे अधोरेखित होते बालपणातील शिक्षणाची नवी व्याख्या. यामाध्यमातून 0 ते 8 वर्षांच्या मुलांसाठी खेळातून शिक्षण, सोबतच कमीत कमी स्क्रीन आणि जास्तीत जास्त खेळ यावर भर दिला जात आहे. बालपण मुलांच्या वाढीसाठी आणि विकासासाठी का महत्त्वाचं आहे यावर चर्चा करण्यासाठी या खास कार्यक्रमात बाल हक्क कार्यकर्ते, शिक्षक, पालक आणि प्रभावशाली व्यक्तींना एकत्र आणलं गेलं आहे. चला तर मग, या चळवळीत सामील व्हा आणि असं जग निर्माण करण्यात मदत करा, जिथं असेल कमी स्क्रीन टाइम आणि जास्त खेळ आणि शिक्षण... आजच शपथ घेऊया - कमी स्क्रीन टाइम आणि जास्त खेळ