बीड शहराला माजलगाव व बिंदुसरा या प्रकल्पातून पाणीपुरवठा केला जातो.. सध्या दुष्काळी परिस्थिती असल्याने बहुतांश भागात बोअरवेलचे पाणी कमी झाले आहे. त्यामुळे बीडकरांना सार्वजनिक पाणी पुरवठ्यावरच अवलंबून राहण्याची वेळ आलीय.. या परिस्थितीमध्ये बीड शहरातील जलकुंभांवरून खाजगी टँकर्समध्ये पाणी भरून ते विक्री करण्याचा उद्योग सुरू असल्याचा आरोप भाजपाचे नेते डॉक्टर योगेश शिरसागर यांनी केलाय..