बीडच्या पाली इथं अंत्यविधी सुरू असताना भरधाव पिकअप वाहन स्मशानभूमीमध्ये शिरल्याने अपघात झालाय.. यात एक जणाचा जागीच मृत्यू झाला तर सात ते आठ जण जखमी झाले आहे.यातील एक जण गंभीर असल्याची माहिती आहे.. जखमींवर सध्या शासकीय रुग्णालयासह इतर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. भरधाव पिकअप चालकाचे नियंत्रण सुटल्यामुळे हा पिकअप थेट स्मशानभूमीत शिरला.. त्यात संभाजी जाधव यांचा मृत्यू झाला..