जगात आसमानी सुलतानी अशी अनेक संकटं निर्माण झालेली असताना, युद्ध, पूर, भूकंप अशा घटनांनी जग झाकोळलेलं असतानाच, एका वाळवंट जगाला आशेचा किरण दाखवतोय. चिली देशातील वाळवंटात चक्क एक फूल उमललं आहे. जिथं कधी पावसाच्या पाण्याचा थेंब पडत नाही, जगातील सर्वाधिक कोरंड वाळवंट अशी ज्याची ओळख त्या अटाकामा वाळवंटात चक्क गुलाबी रंगाचं फूल उमत असल्यानं आश्चर्य व्यक्त होतंय. कसं घडतं हे आणि त्याच्या अभ्यासातून मानवाला काय साध्य होऊ शकतं पाहूया एक रिपोर्ट