कॅनडाचे माजी पंतप्रधान जस्टीन ट्रुडो हे त्यांच्या राजकीय धोरणांमुळे चर्चेत असायचेच. आता ते पुन्हा चर्चेत आलेत ते त्यांच्या नव्या अफेअरमुळे. त्यांचे अफेअर हे राजकीय नव्हे तर पूर्णपणे वैयक्तिक आहे. ते एका यॉटवर दिसले ते प्रसिद्ध गायिका कैटी पेरी हिच्यासह... बस आणि जगभरातच दोघांच्या नात्यावर चर्चा झडू लागल्या. त्यातच कैटी पेरीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल होतोय ज्यात ती एका फॅनच्या प्रपोझलला उत्तर देतेय. तिचं उत्तर ऐकल्यानंतर ट्रुडो आणि तिच्या नात्यावर आणखी चर्चा रंगू लागल्यात. आता दोघांनीही जाहीरपणे आपल्या नात्याची कबुली दिलेली नसली तरी त्यांचा जो फोटो जाहीर झालाय त्यावरून दोघांची केमिस्ट्री बरीच पुढे गेल्याचं दिसतंय पाहूया एक रोमॅन्टिक ग्लोबल रिपोर्ट....