मतदार याद्यांमधील छेडछाडीवर मविआने निवडणूक आयोगाला पत्र लिहिलं होतं.विधानसभा निकालाआधी मविआने हे पत्र लिहिलं होतं. पत्रावर 3 प्रमुख मविआ नेत्यांच्या स्वाक्षऱ्याही आहेत.मविआच्या पत्रातून भाजपवर गंभीर आरोप करण्यात आलेत.खा. संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर टीका केली.निवडणूक आयोग चोराच्या भूमिकेत असून आयोग भाजपची शाखा झाली,असं राऊत म्हणालेत. तर नि. आयोगाविरोधातलं आंदोलन सुरुच राहणार असा ठाम पवित्राही राऊतांनी घेतलाय.