#Pandharpur #PandharpurCorridor #Warkari पंढरपूर शहराच्या बहुचर्चित कॉरिडॉर प्रकल्पावरून सध्या वारकरी संप्रदाय आणि प्रशासन यांच्यात जोरदार वाद सुरू आहे. नुकत्याच झालेल्या एका बैठकीत वारकऱ्यांनी पंढरपूरच्या विकासाला पूर्ण पाठिंबा दिला, मात्र कॉरिडॉरसाठी होणाऱ्या भूसंपादनाला तीव्र विरोध दर्शवला आहे. दुसरीकडे, जिल्हाधिकाऱ्यांनी कॉरिडॉर कोणत्याही परिस्थितीत पूर्ण होणारच, अशी ठाम भूमिका घेतल्यामुळे हा वाद अधिक पेटण्याची चिन्हे आहेत.