प्रेमाला सीमा नसते असं म्हणतात. प्रेमामध्ये जीवाचीही पर्वा केली जात नाही. आयुष्य उधळून लावणाऱ्या अनेक घटना, किस्से आपण इतिहासात वाचले असतील. या आधुनिक युगात मात्र प्रेमासाठी घरच उधळून लावणाऱ्या प्रेयसीचा प्रताप समोर आला आहे. छत्रपती संभाजीनगरमधील या प्रेयसीने प्रियकराच्या प्रेमाखातच घरातच हात (Girlfriend steals from her own house) मारला. प्रियकराला कर्जातून बाहेर काढायचंय मग आपल्याला काहीतरी करायला हवं. मग काय घरात जे काही मौल्यवान तिला दिसलं त्यावर हात साफ करीत तिने कुटुंबाला कंगाल केल्याचं समोर आलं आहे.