बांगलादेशी महिला लाडकी बहीण योजनेची लाभार्थी. मुंबईतील बांगलादेशी महिला योजनेची लाभार्थी.नियम, अटी असतानाही बांगलादेशी महिलेला लाभ. कामाठीपुरातून ताब्यात घेतलेली एक महिला लाभार्थी. क्राइम इंटेलिजेंस युनिट (सीआययू) ने बनावट कागदपत्रांसह भारतात बेकायदेशीरपणे राहिल्याबद्दल कामठीपुरा येथून पाच बांगलादेशी नागरिकांना अटक केली आहे, ज्यात तीन महिलांचा समावेश आहे. पकडलेल्या बांगलादेशी महिलांपैकी एक, उर्मिला २३ वर्षीय खातुन हिला गेल्या वर्षी विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी लाडकी बहीन योजनेचे दोन हप्ते मिळाले होते.