भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यातील मांढळ येथे पोळ्याच्या पाडव्याच्या उत्सवात मार्बत काढण्याच्या कार्यक्रमात गोंधळ झाला. दोन मार्बतीच्या कारणावरून दोन गटातील युवकांमध्ये तीव्र वाद निर्माण झाला. वादातून सुरू झालेली बाचाबाची लवकरच तुफान हरामारीत परिवर्तित झाली. त्यामुळे काही काळ वातावरण तणावपूर्ण बनले. गावात गोंधळाची परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण पसरले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. या प्रकरणी पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला नसला तरी व्हिडिओ मात्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होतोय.