महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत ग्राम रोजगार सहाय्यकांसाठी राज्य सरकारने जारी केलेल्या नव्या शासन निर्णयाविरोधात भंडाऱ्यात तीव्र आंदोलन करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर काँग्रेस नेते नाना पटोले, खासदार प्रशांत पडोळे आणि ग्राम रोजगार सेवक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी एकत्र येत शासन निर्णयाची होळी करून निषेध नोंदवला. नव्या जीआरमध्ये ग्राम रोजगार सहाय्यकांवर लादण्यात आलेल्या अटी अन्यायकारक असून त्या तात्काळ मागे घ्याव्यात. अशी मागणी आंदोलकांनी यावेळी केली. यावेळी सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करत ग्राम रोजगार सेवकांनी संताप व्यक्त केला. ग्रामरोजगार सहाय्यकांच्या हक्कांसाठी लढा सुरूच राहील, असा इशाराही आंदोलनकर्त्यांनी दिला.