तपोवन विद्यालयातील मेथी भाजी वादावरून MNS चे अनोखं आंदोलन, शाळा व्यवस्थापनाला भाज्या देऊन निषेध

भाईंदरमधील तपोवन विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या डब्यातील मेथीच्या भाजीवरून सुरू झालेला वाद आता नव्या टप्प्यात पोहोचला आहे. या प्रकरणावरून मनसे विद्यार्थी सेनेकडून शाळेबाहेर आंदोलनाची घोषणा करण्यात आली होती. मात्र विद्यार्थ्यांना कोणताही त्रास होऊ नये, अशी विनंती पोलिसांनी केल्यानंतर मनसे पदाधिकाऱ्यांनी आंदोलनाची दिशा बदलत नवघर पोलीस ठाण्यात निवेदन दिले आणि मेथी, कांदा तसेच हिरव्या भाज्या देऊन प्रतीकात्मक निषेध नोंदवला.त्यानंतर मनसेचे पदाधिकारी थेट तपोवन विद्यालयात पोहोचले आणि शाळा व्यवस्थापनाला मेथी व कांद्याची भाजी भेट दिली. यावेळी कांदा, बटाटा, गाजर आणि बीट यांसारख्या भाज्यांचे पौष्टिक फायदेही शाळा व्यवस्थापनाला सांगण्यात आले. मुख्याध्यापिका क्लोथिल्डा बापतिस्ता यांनी ही भेट स्वीकारली असून शिक्षण विभागाकडून मिळणाऱ्या सर्व निर्देशांचे पालन केले जाईल, अशी भूमिका शाळेकडून मांडण्यात आली आहे.

संबंधित व्हिडीओ