गुजरातमधील मेहसाणा जिल्ह्यातील मोढेरा सूर्य मंदिराला तब्बल १००० वर्ष पूर्ण झाली आहेत. भारताचा समृद्ध ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारशाचं हे सूर्यमंदिर अद्भूत असं प्रतीक मानलं जातं
सुमारे एक हजार वर्षांपूर्वी 1026-27 इसवी सनामध्ये सोलंकी वंशाचा राजा भीमदेव पहिला यानं हे मंदिर बांधलं होतं.या मंदिराची वास्तुकला आणि बारकाईनं कोरलेली शिल्पकला आजही लोकांना आकर्षित करते. मंदिराचे सूर्य कुंड, सभामंडप आणि गर्भगृह असे तीन मुख्य भाग आहेत. सूर्यकुंडाजवळ सुमारे 108 छोटी-मोठी मंदिरं आहेत.तर सभामंडपाचे 52 स्तंभ आणि गर्भगृहाचे 24 स्तंभ आहेत. डिसेंबर 2022 मध्ये मंदिराचा समावेश युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत करण्यात आला.