मुंबईहून रायगड जिल्ह्यातील रोहा स्थानकातून प्रवास करणाऱ्यांसाठी मोठी बातमी आहे. आता मुंबई ते रायगडचा प्रवास सोपा होणार आहे. रेल्वेने रोहा स्थानकात ७६व्या प्रजासत्ताक दिनापूर्वी 10 एक्स्प्रेस आणि सुपरफास्ट गाड्यांना थांबा देण्यास मान्यता दिली आहे. रेल्वेच्या या निर्णयाने रोहा येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे... शनिवारी राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते इंदौर एक्स्प्रेसच्या थांब्याला हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आलं. तर रोहा स्टेशनच्या सौंदर्यीकरणासाठी २० कोटी रुपयांची मंजुरी देण्यात आल्याची माहिती सुनील तटकरे यांनी दिली.