छत्रपती संभाजीनगर महानगरपालिका स्थायी समिती सभापती पदासाठी आज निवडणूक पार पडणार आहे. भाजपने समर्थनगर प्रभागाचे नगरसेवक अनिल मकरिये यांना उमेदवारी जाहीर केली.एमआयएम पक्षाने नगरसेवक खान अब्दुल मतीन यांना सभापतिपदाची उमेदवारी दिली. भाजप, शिंदेसेनेचे स्थायी समितीत बहुमत आहे. त्यामुळे निवडणुकीत मकरिये यांच्या निवडीची औपचारिक घोषणा होईल.पण ऐनवेळी शिवसेना नगरसेवक काय भूमिका घेतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे.