जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन करण्यासाठी महायुती एकत्र येणार अशी सूत्रांकडून माहिती मिळतेय.रायगड , सातारा , परभणी, धाराशीव येथे महायुती म्हणून एकत्र जिल्हा परिषद सत्ता स्थापन करणार असल्याची माहिती मिळतेय.रायगड - परभणीत जिल्हा परिषद भाजप, एनसीपी, शिवसेना एकत्र सत्ता स्थापन करणार अशी सूत्रांची माहिती मिळतेय.तर सातारा जिल्हा परिषदेत मात्र अद्याप स्पष्टता नाही. तिथं देखील महायुतीचे तीन पण एकत्र यावे यासाठी हालचाली असल्याची माहिती मिळतेय. तिन्ही पक्ष जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, सभापती वाटून पद घेणार असल्याची माहिती मिळतेय.