दिल्लीच्या राजकीय वर्तुळामध्ये सध्या ऑपरेशन दोनशे बाहत्तर ची चांगलीच चर्चा सुरू आहे. नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्या बळावरती केंद्रात भाजपचं दोनशे चाळीस खासदारांच्या पाठिंब्यानं अल्पमतातलं सरकार बनलेलं आहे. चंद्राबाबू नायडू सोळा आणि नितीश कुमार यांचे बारा खासदार यावर केंद्र सरकार टिकून आहे. या दोन्ही नेत्यांवर अवलंबून राहणं सोडण्यासाठी भाजपकडनं ऑपरेशन दोनशे बाहत्तर च प्लॅनिंग केलंय असं बोललं जातंय. ज्यामध्ये शरद पवार गटाचे आठ आणि उद्धव ठाकरे गटाचे नऊ खासदार यांच्यावर भाजपची नजर आहे. भाजपच्या गेम प्लॅन मध्ये दोनशे बाहत्तर खासदार जमवणं सुरू आहे.