पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपने कौस्तुभ गावडे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर पंढरपूर येथील डॉ. बी.पी रोंगे यांनी बंडाचे निशाण फडकावलंय.. रोंगेंच्या बंडखोरीमुळे पुणे शिक्षक मतदारसंघात भाजपला मोठा धक्का बसलाय... दरम्यान बी. पी. रोंगे सकाळी विठ्ठलाचे दर्शन घेऊन उमेदवारी अर्ज भरण्यासाठी पुण्यात दाखल झालेत.रोंगे गेल्या काही वर्षांपासून शिक्षक मतदारसंघात तयारी करत आहेत. भाजपची उमेदवारी मिळेल अशी त्यांना आशा होती, ऐनवेळी उमेदवारी नाकारल्याने रोंगे यांनी निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आहे..