मुंबईतील विद्याविहार पुलाच्या नामकरणावरून आता राजकारण तापलं आहे...भाजप आमदार पराग शहा यांनी या पुलाला कॅप्टन स्मित मच्छार यांचं नाव देण्याची मागणी केली होती.. त्यासाठी त्यांनी पत्र देखील दिलं होतं..मात्र पुलाच्या उद्घाटनाआधीच ठाकरेंच्या शिवसेनेने आक्रमक भूमिका घेत पुलावर थेट 'पद्मश्री नाना पाटेकर सेतू' असा फलकच लावला आहे..इतकंच नाही तर ठाकरे गटाने महापौर रितू तावडे यांची भेट घेऊन पुलाला नाना पाटेकर यांचंच नाव द्यावं अशी मागणी पत्राद्वारे केली आहे..त्यामुळे आता या पुलाच्या नामकरणावरून नवा वाद पेटण्याची शक्यता आहे