संपूर्ण देशभरात गॅसचा तुटवडा निर्माण झाल्याने बुलढाणा जिल्ह्यात देखील नागरिकांनी गॅस सिलेंडर एजन्सी समोर रांगा लावत गर्दी केली.. मात्र बुलढाणा जिल्ह्यात घरगुती गॅसचा कुठलाही तुटवडा नसून दिवसाला सरासरी 10 हजार गॅस सिलेंडरची मागणी आहे, सध्या 25 हजार पेक्षा अधिक सिलेंडर उपलब्ध असून नियमित पुरवठा सुरू आहे, याच संधीचा फायदा घेत अनेक ठिकाणी गॅसचा काळाबाजार केल्याचे देखील समोर आले आहे, त्यामुळे जिल्हाभरात पथकामार्फत केलेल्या छापेमारीत 22 गॅस सिलेंडर जप्त करण्यात आले आहेत, तर गॅस सिलेंडर संदर्भात समाज माध्यमांवर अफवा पसरवणाऱ्यावर कडक कारवाईचा इशारा जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आला आहे...