आखाती देशातील युद्धांमुळे गॅस पुरवठा खंडित झाला आहे. परिणामी व्यावसायिक गॅस सिलेंडर पूर्णतः बंद झाल्यामुळे हॉटेल रेस्टॉरंट आणि ढाबेवाल्यांनी कोळशावरील लोखंडी चुलीकडे मोर्चा वळविला आहे. गेल्या आठवड्याभरात कोळशाच्या शेगड्यांना प्रचंड मागणी वाढली असून ती मागणी पूर्ण करण्यासाठी पुण्यातील कारखान्यांमध्ये कारागीर रात्रंदिवस मेहनत करत आहे. या संदर्भात सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी यशपाल सोनकांबळे यांनी.