राज्यातील पहिल्या क्रमांकाची मिरचीची बाजारपेठ असलेल्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये यावर्षी मिरचीच्या उत्पादनात प्रचंड अशी घट आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मागील वर्षाच्या तुलनेत आतापर्यंत अवघ्या तीस टक्के मिरचीची आवक झाली आहे. मात्र कालचा दिवस मिर्ची व्यापाऱ्यांसाठी चांगला राहिलाय.