छत्रपती संभाजीनगरमध्ये जागेच्या वादेतून क्रूरपणे प्रमोद पाडसवान या तरुणाची हत्या झाली होती... पण या घटनेनंतर देखील या भागातील काही विशिष्ट लोकांची दहशत काही संपत नाही... हत्या झालेल्या प्रमोद पाडसवान यांच्या कुटुंबीयांची पालकमंत्री शिरसाट यांनी भेट घेतली... यावेळी पाडसवान कुटूंबियांनी काही राजकीय लोकांची नावे घेतली... त्यानंतर तेथील मंडळाचे संस्थापक गव्हाड यांचे वडील त्या ठिकाणी आले... 'तू माझ्या मुलाचे नाव का घेतले?' असे म्हणत राडा घातला... त्यांना अडवणाऱ्या पाडसवान कुटुंबातील एका महिलेला मारहाण केली... धक्कादायक म्हणजे हा सर्व प्रकार पोलिसांच्या समोरच घडत होता... त्यानंतर पाडसवान कुटुंबीयांच्या सांत्वन करण्यासाठी आलेल्या लोकांचा पारा चढला...