छटपूजेवरून राजकारण तापल्यानंतर मुंबईसह अनेक ठिकाणी छटपूजेचं आयोजन करण्यात आलंय. मुंबईतील जुहू चौपाटीवर भव्य छठपूजा-2026 महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिवसेना नेते संजय निरुपम आणि बिहारी फ्रंट यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या महोत्सवाला यंदा 29 वर्षे पूर्ण होत आहेत. संध्याकाळी 4 ते रात्री 10 या वेळेत होणाऱ्या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. यावेळी अभिनेते शेखर सुमन यांना बिहार गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून,
समाजसेवेसाठी सोनू सूद आणि छठपूजा गीतांमधील योगदानाबद्दल अभिनेत्री तमन्ना भाटिया यांचाही विशेष सन्मान केला जाणार आहे.