आषाढी एकादशीच्या पर्वकाळात विठ्ठलाचे दर्शन करून लाखो भाविकांनी आता पंढरपुरातून परतीचा प्रवास धरला आहे. परतीची वारी या निमित्ताने सुरू झाली. विठ्ठलाचे दर्शन घेत पुढील वर्षभराची ऊर्जा घेत वारकरी आता आपल्या गावी निघाले आहेत. त्यामुळे आपसूकच जातो माघारी पंढरीनाथा... तुझे दर्शन झाले आता... अशीच भावना प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावर दिसून येते आहे. . याचबाबत आढावा घेतला आहे आमचे प्रतिनिधी संकेत कुलकर्णी यांनी...