नाशिकमध्ये यंदा 36 दिवसातच 60 दिवसांचा पाऊस झाला आहे. सहा जुलै पर्यंत सरासरी 211 मिलिमीटर पाऊस कोसळत असतो मात्र यंदा मात्र 411 मिलिमीटर एवढ्या पावसाची नोंद झालीये... 23 पैकी भाम, भावली, वालदेवी, केळझर, आळंदी, भोजापुर, हरणबारी, केळझर ही 8 धरणं 100 टक्के भरली आहेत. तर 8 धरणांचा पाणीसाठा 60 टक्क्यांहून अधिक झाला असून सध्या 12 धरणांमधून विसर्ग सुरु आहे.