Dharashiv| रेशनच्या तांदळात चक्क दातांची कवळी, तांदूळ निवडताना महिलेला आढळली 7 ते 8 दातांची कवळी

रेशन दुकानातून वितरित होणाऱ्या धान्याच्या गुणवत्तेबाबत सातत्याने तक्रारी होत असतानाच धाराशिव जिल्ह्यातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे... लोहारा तालुक्यातील जेवळी गावात रेशन दुकानातून आणलेल्या तांदळात चक्क सात ते आठ दातांची कवळी आढळल्याचा दावा करण्यात आला आहे... तांदूळ निवडण्यासाठी चाळणीत घेतल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला... या घटनेमुळे रेशन धान्याच्या गुणवत्तेवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून रेशनधारकांमधून प्रशासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे...

संबंधित व्हिडीओ