उत्तराखंड हवामान केंद्राने मुसळधार पावसाचा इशारा जारी केला आहे.७ आणि ८ जुलै रोजी उत्तराखंडच्या चार जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तरकाशी, रुद्रप्रयाग, टिहरी आणि चमोली येथे मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.मुसळधार पावसामुळे आपत्ती व्यवस्थापन विभागाने सतर्कता जारी केली आहे.मुसळधार पावसामुळे पर्यटकांना उंच हिमालयीन प्रदेशात जाऊ देऊ नका असा सल्ला,मुसळधार पावसात वाहने आणि पादचाऱ्यांची हालचाल जवळजवळ बंद असते.